Call us : +91 7447795905

मुंबई | Last Updated: 18 Apr 2018


मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमला सिंचन विभागाकडून मिळणारं पाणी बॉम्बे हायकोर्टानं रोखलं आहे. पुण्यात होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी राज्य सरकारनं पाणी देऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. औद्यगिक वापरासाठी असलेलं पाणी क्रिकेट स्टेडियमसाठी कसं वापरलं जातं? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला. राज्य सरकारसोबतच्या करारात औद्योगिक वापरासाठीचा उल्लेख असतानाही वर्षानुवर्षे कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा ठपकाही मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला. पुण्यातल्या आयपीएल सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार? : हायकोर्ट

पावना धरणातून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला दिवसाला अडीच लाख लीटर पाण्याचा पुरवठा होतो.

दुष्काळादरम्यान महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी पाणी पुरवठा करण्याला विरोध करत 'लोकसत्ता मूव्हमेंट' या सेवाभावी संस्थेने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.

सीएसकेच्या चाहत्यांना धक्का, होमग्राऊंडवरील सामने रद्द मुंबई महानगरपालिकेने पुढील किमान पाच वर्ष वानखेडे स्टेडियमला कोणताही अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यास नकार दिला. मात्र आयपीएलसाठी वानखेडे स्टेडियमला आपल्या जवळचं 'खास' पाणी देण्यास तयार असल्याचं मुंबई महानगरपालिकेने हायकोर्टात सांगितलं. अर्थातच हे 'खास' पाणी म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनला पालिकेकडून विकत घ्यावं लागणारं पाणी आहे.